
पुणे : शहरांची झपाट्याने वाढत जाणारी लोकसंख्या, हवामानातील बदल यामुळे येणारी नैसर्गिक आपत्ती यावर जी २० परिषदेच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. भविष्यात शहरे कशी केली जात असताना त्यासाठीची पंचसूत्री ठरविण्यात आली असून, या त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
शाश्वत शहरे, सर्वार्थाने सक्षमीकरण, नावीन्यपूर्ण वित्तीय प्रणाली, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि लोककेंद्रीत शहरांचे नियोजन या पाच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पायाभूत सुविधांवर आणखी तीन बैठका होणार आहेत.
त्यामध्ये याच पाच मुद्द्यांना आधार मानून जी २० चे सदस्य देश चर्चा करून भविष्यातील धोरण निश्चित करतील. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सहसचिव सॉलोमन अरोकियाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पीआयबीच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी उपस्थित होत्या.
पुण्यातील जे. एब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये १६ आणि १७ जानेवारी रोजी ‘जी २०’ परिषदेत इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची (आयडब्ल्यूजी) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते.
‘‘पुण्यात दोन दिवसीय बैठक झाली. यामध्ये पाककृती, संस्कृती, इतिहास जाणून प्रभावित झाले. परिषदेच्या तयारी उत्तम केल्याने आनंद व्यक्त केला’’, असे सांगत सॉलोमन अरोकियाराज म्हणाले, आयडब्ल्यूजी’ बैठकीत मेक्सिको येथे महापालिकांनी एकत्र येऊन ट्रस्ट स्थापन केले आहे.
बाँडच्या माध्यमातून निधी उभा करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल विकसित केले आहे. त्याचे सादरीकरण करण्यात आले. भारतातील महापालिकांचे मूल्यांकन करण्यात आले असून त्यामध्ये ३५ महापालिकांचा यासाठी क्षमता आहे. त्यामुळे रोखे पद्धतीने प्रारूप विकसित करण्याचा विचार करता येईल, अशी चर्चा करण्यात आली.
आशियायी विकास बँकेने तीन कार्यशाळा घेतल्या. यामध्ये १४ तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली. त्यात महापालिका प्रशासनाची क्षमता वाढविणे, जगभरातील शहरातील वित्तपुरवठ्याचे प्रारूप, पायाभूत सुविधांसाठी आर्थिक गुंतवणूक यावर चर्चा केली. याचा आशियायी बँकेकडून मसुदा तयार केला जाणार आहे. तसेच 'आयडब्ल्यूजी’ची पुढील बैठक विशाखापट्टणम येथे २८ आणि २९ मार्चला होणार आहे. त्यामध्ये पंचसूत्री आधार मानून चर्चा केली जाईल.
सध्या ५० टक्के लोकसंख्या शहरात राहत आहे, हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण आर्थिक संधी आणि मिळणाऱ्या सुविधा यामुळे स्थलांतर रोखणे अशक्य आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे महत्त्वाचे ठरणार आहे अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
विकसित देश, विकसनशील देशातील प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील आव्हाने भिन्न आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी कार्यपद्धती असेल पण हे करताना शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, खासगी पद्धतीने निधी उभारणी करणे, नैसर्गिक स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून त्यांचा पुनर्वापर करणे याची चर्चा झाली.
पुण्यात ‘जी २०’ परिषद होत असताना नागरिकांना पुण्यासाठी काय मिळणार असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे असे विचारले असता त्यावर अरोकियाराज म्हणाले, ‘‘जी २०’ ही परिषद एका शहरासाठी किंवा देशाला काय मिळणार हे ठरविण्यासाठी होत नाही.
तर जगभरातील शहरांच्या विकासाचा वेध घेऊन त्यादृष्टीने धोरण ठरविणे, वित्त पुरवठा कसा करता येईल याचे निर्णय घेण्यासाठी आहे. या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. पण या धोरणानुसार भविष्यात नवीन प्रकल्प, निधी पुरवठा होऊ शकतो, त्याचा उपयोग शहरांसाठी होईल. तसेच पायाभूत सुविधांचा विचार करून अनेक देश एका व्यासपीठावर येऊन चर्चा करत आहेत हे महत्त्वाचे आहे.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




