G-20 Summit : जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन; अंबानी, अदानींसह ५०० जणांना निमंत्रण

नवी दिल्ली : येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नामांकित व्यक्तींना, उद्योगपतींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

यात रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांच्यासह ५०० जणांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

येत्या ९ व १० सप्टेंबरला होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून व्यवस्था पूर्ण झाली असून आता दिल्लीत सुरक्षा जवानांचा वेढा दिल्लीतील बहुतेक ठिकाणी लागला आहे. ९ सप्टेंबर रोजी परिषदेची सुरुवात झाल्यानंतर रात्री राष्ट्रपतींतर्फे पाहुण्यांना स्नेहभोजन दिले जाणार आहे.

या स्नेहभोजनासाठी देशातील ५०० मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यात रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी, अदानी समुहाचे गौतम अदानी यांच्यासह टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, एअरटेलचे सुनील मित्तल,

बिरला समुहाचे कुमार मंगलम बिर्ला यांची प्रामुख्याने उपस्थित असेल. पाहुण्यांना सर्व प्रकारचे व्यंजन मिळणार आहे. तसेच राजस्थानमधून चांदी व गोल्ड प्लेटेड ताट, वाट्या आण ग्लास तयार करून घेतले आहे. यासाठी देश-परदेशातून विशेष शेफ बोलविण्यात आले आहेत.

Weather Alert: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत धुव्वांधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

मेट्रोचा वापर करावा

येत्या ८ ते १० सप्टेंबर या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. प्रामुख्याने विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनी मेट्रोनेच प्रवास वापर करावा, असे आवाहन केले आहे. कारण मोटारीने जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply