Financial Shares Fall After RBI Decision : रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् बँकांच्या शेअर्समध्ये 10 टक्के घसरण; बजाज फायनान्सचे सर्वाधिक नुकसान

Financial Shares Fall After RBI Decision : SBI कार्ड्स, बजाज फायनान्स, HDFC बँक आणि ICICI बँकेसह टॉप बँकिंग आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स आज 7 टक्क्यांपर्यंत घसरले. या घसरणीमागचे कारण म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय. RBI ने बँका आणि NBFC साठी ग्राहक कर्जाचे जोखीम वेटेज 25% वाढवले ​​आहे.

याचा अर्थ असा की असुरक्षित कर्ज बुडण्याची भीती लक्षात घेता बँकांना आता पूर्वीपेक्षा 25% अधिक तरतूद करावी लागणार आहे. आत्तापर्यंत बँका आणि NBFC साठी ग्राहक कर्जाचे जोखीम वेटेज 100% होते, ते आता 125% पर्यंत वाढले आहे.

Pune Crime News : नमाजासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

या निर्णयानंतर टॉप बँकिंग आणि NBFC च्या शेअर्समध्ये घसरण झाली. बजाज फायनान्सचे शेअर्स सुमारे 3.5 टक्के, एसबीआय कार्ड्स 7 टक्के, एचडीएफसी बँक 1.2 टक्के, आरबीएल बँक 10 टक्क्यांनी घसरले.

RBI ने म्हटले आहे की गृहनिर्माण, शिक्षण, वाहन आणि सुवर्ण कर्ज वगळता बँका आणि NBFC साठी ग्राहक कर्जाचे जोखीम वेटेज 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. बँकांनी क्रेडिट कार्ड कर्जासाठीचे जोखीम वेटेज 125 टक्क्यांवरून 150 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे.

बीएसईवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बजाज फायनान्सचे शेअर्स 1.78 टक्के, एसबीआय कार्ड 5.35 टक्के, आयसीआयसीआय बँक 1 टक्के आणि एचडीएफसी बँक 0.29 टक्के घसरले आहेत. बँक निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर तो 476.50 अंकांच्या किंवा 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 43685 वर आहे.

फिन निफ्टी (निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस) देखील घसरणीसह व्यवहार करत आहे. तो 12 वाजण्याच्या सुमारास 125.85 अंक किंवा 0.64 टक्के घसरणीसह 19,606.40 वर आहे. तर निफ्टी सध्या केवळ 7.20 अंकांची घसरण दाखवत आहे आणि सेन्सेक्स 87.58 टक्क्यांवर आहे. म्हणजे एकूण बाजार स्थिर आहे, पण बँक आणि वित्तीय शेअर्सची स्थिती वाईट आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply