Fight Between Two Group : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता; पाण्यावरून 2 गटात हाणामारी

Fight Between Two Group : उन्हाळा सुरु होऊन काही दिवस झाले असतानाच, राज्यातील काही भागात पाण्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. राज्यातील काही जिल्हातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यातही दुष्काळाची दाहता जाणवू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरातही नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. आता याच पाणी भरण्यावरून छत्रपती संभाजीनगरात २ गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता आतापासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील पाणी भरण्यावरून लोकांमध्ये मारहाण झाली आहे. बोअरवेलचं पाणी भरण्यावरून भास्कर आरगडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

Badlapur Fire News : केमिकल कंपनीत भीषण अग्नितांडव; आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. वाळूजमधील बोअरवेलवर भास्कर आरगडे आणि त्यांचे इतर सहकारी, ताराचंद ठोसे आणि त्यांची पत्नी पाणी भरण्यासाठी आले होते. त्यावेळी भास्कर आरगडे आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांचे ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला. यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची मिळत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply