Farmers protest: शेतकऱ्याच्या प्रश्नावर तोडगा निघणार? मुख्यमंत्र्यांची उद्या शिष्टमंडळासोबत बैठक

Mumbai News: शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईवर ५ वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं लाल वादळ धडकणार आहे. ५ वर्षांपूर्वी ज्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पायी मुंबई गाठली होती. आता पुन्हा त्याच मागण्यांसाठी शेतकऱ्यांवर नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्याची वेळ आलीय.

१४ मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रोश व्यक्त एल्गार पुकारला आहे. कांद्याला ६०० रुपये अनुदान, हमीभाव, वनजमिनींचा प्रश्न, कर्जमाफी यासह एकूण १४ मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. सध्या नाशिकच्या रस्त्यांवर घोंगवणार हे लाल वादळ लवकरच मुंबईत धडकणार आहे.

उद्या मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक

दरम्यान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत उद्या सरकार मुंबईत बैठक घेणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता मुंबईत मंत्रालय किंवा विधानभवनात ही बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मात्र सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सरकार सोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर लाँग मार्च मुंबईत धडकणार आहे. मात्र बैठकीत तोडगा निघाला तर लॉंग मार्च स्थगित करणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply