Farmer Rasta Roko : नगर- दौंड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; दूध, शेतमालाला भाव देण्याची मागणी

Farmer Rasta Roko : शेतकऱ्यांच्या दुधाला आणि शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा; या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शेतकऱ्यांच्यावतीने  नगर- दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. 

शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्याने आणि शेतीला जोडधंदा असलेल्या  दूध व्यवसाय हा देखील अडचणीत आल्याने मागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भारत हा कृषिप्रधान देश असताना देशाचा पोशिंदा  शेतकरी कर्जबाजारी होत आहे. परिणामी काही शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. दरम्यान कोळगाव परिसर हा कायम दुष्काळी पट्ट्यात असल्याने मागील काही वर्षापासून येथील शेतकरी हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. मात्र दुधाला योग्य भाव नसल्याने गाई म्हशींच्या गोठ्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांकडे निर्माण झाला आहे. 

Yavatmal News : अनैतिक संबंधांचा संशय, पतीने पत्नीसह चौघांना संपवलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना

तर आता धरणे आंदोलन 

दूध दर वाढीसाठी सरकारकडून अद्याप निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कांदा, ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे म्हणत हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही; तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply