Farmer Protest : अश्रूधुराच्या नळकांड्याला मिरची पावडरने प्रत्युत्तर; खनौरी सीमेवर शेतकरी आक्रमक, १२ पोलीस गंभीर जखमी

Farmer Protest  : पंजाब-हरियाणाच्या खनौरी सीमेवर शेतकरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री सुरु आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. 

पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे. खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चारा आणला आहे. शेतकरी चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावत आहेत. शेतकऱ्यांनी चाऱ्याला आग लावल्यानंतर सर्वत्र धूर पसरत आहे. या धूराचा त्रास पोलिसांना होताना दिसत आहे.

Chandrapur Crime : वृद्ध आई-वडिलांना घरात डांबून जन्मदात्या मुलाने केला प्राणघातक हल्ला; आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवर रोखलं आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यामुळे घटनास्थळी सर्वत्र धूर पसरत आहे. 

हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून खनौरी सीमेवर चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावली जात आहे. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेराव घातला. यामुळे शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक केली.

चाऱ्यामध्ये मिरची पावडर टाकून आग लावल्यामुळे १२ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. सुख्या चाऱ्यात मिरची पावडर टाकून आग लावल्याने परिसरात विषारी धूर पसरत आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा गुरुवारी दिल्लीकडे कूच होणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता शुक्रवारी सांयकाळी शेतकऱ्यांकडून नवी रणनीती आखली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आंदोलनाची पुढील दिशा कशी असणार, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply