Fake Currency : सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट; संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Fake Currency : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापल्याची धक्कादायक घटनापिंपरी चिंचवड  शहरातून समोर आली आहे. नोटा छापणाऱ्या या टोळीचा देहू रोड पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केलाय. तसेच या प्रकरणी संशितांना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.

बनावट नोटा कशा सापडल्या?

एक इसम दुचाकी गाडीवर परिसरातील हॉटेल रत्ना येथे चहा पिण्यासाठी आला होता. सदर इसमाच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. त्यांनी लगेचच त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने आपले नाव ऋतिक चंद्रमणी खडसे असे सांगितले. पुढे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात भारतीय चलनाच्या बनावट असलेल्या 500 रुपयांच्या एकूण 140 नोटा असलेला बंडल आढळून आला.

Pune Crime News : पुण्यात वाहनांची पुन्हा तोडफोड; हातात कोयते, हॉकी स्टिक घेत 10 ते 12 वाहनांची तोडफोड

त्यानंतर सदर इसमाने पोलिसांना असे सांगितले की, या नोटांच्या बदल्यात त्याला भारतीय चलनाच्या खऱ्या 60नोटा म्हणजेच तीस हजार रुपये रोख मिळणार होते. पोलिसांनी आपल्या खाक्या त्याला दाखवताच त्याने या गुन्ह्यामागे असलेले खरे सूत्रधार आणि भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या या बनावट नोटा कोठे छापल्या जात आहेत याची माहिती सांगितली. मिळालेल्या माहितीच्या आधारे देहूरोड पोलिसांनी सरळ ते ठिकाण गाठले ज्या ठिकाणी हा काळा कारभार सुरू होता.

 

प्राप्त माहितीनुसार, मुकाई चौक किवळे या ठिकाणी एक इसम भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर परदेशी यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर परदेशी यांनी आपल्या इतर पोलीस सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी सापळा रचला होता. देहूरोड पोलिसांनी भोसरी परिसरात छापा टाकत एका घरात या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेली प्रिंटिंग मशीन तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कागद, सदर ठिकाणावरून जप्त केला.

त्याचबरोबर या गुन्ह्याशी संबंधित असलेले सूरज श्रीराम यादव(41)राहणार चरोली बुद्रुक ग्लोबल हाईट फ्लॅट नंबर 104 ,आकाश युवराज दंगेकर (22) राहणार विठ्ठल मंदिराच्या मागे आकुर्डी, सुयोग दिनकर साळुंखे (33) राहणार आकुर्डी, तेजस वासुदेव बल्लाळ (19) राहणार रामनगर चंद्रकांत वसाहत भोसरी, प्रणव सुनील गव्हाणे (30) राहणार आळंदी रोड मुक्ताई हाइट्स प्लॉट नंबर 201 भोसरी यांना ताब्यात घेतलं.

अशा पद्धतीने भारतीय चलनाच्या बनावट नोटा या पोरांनी छापण्याचा धंदा कधीपासून सुरू केला आहे व ते या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी कोणाकडे देत होते? तसेच अटक करण्यात आलेल्या संशयीतांच्या व्यतिरिक्त आणखी इतर कोणचा या कळ्या कारभाराशी संबंध आहे का? याचा तपास देखील पुढे आता देहुरोड पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply