Rajpal Yadav Birthday: 20 व्या वर्षी पत्नीनं सोडली साथ,कपडे शिवण्याचं केलं काम; राजपाल यादव कसे झाले 'कॉमेडी किंग', जाणून घ्या संघर्षमय प्रवास

Rajpal Yadav Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव (Rajpal Yadav) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. आज (16 मार्च) त्यांचा 53 वा वाढदिवस आहे. गेल्या 25 वर्षांपासून राजपाल यादव हे विविध चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी राजपाल यादव यांचे आयुष्यात अनेक अडचणी आल्या. या अडचणींना सामोरे जाऊन राजपाल यादव हे बॉलिवूडचे कॉमेडी किंग झाले.

कपडे शिवण्याचं केलं काम

राजपाल यादव यांचा जन्म 16 मार्च 1971 रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील कुलरा शहरात झाला. त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांचे कपडे शिवण्याचंही काम केलं. त्यांनी कला आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे.

Weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

20 व्या वर्षी पत्नीनं सोडली साथ

1990 मध्ये राजपाल यादव विविध ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करू लागले. दरम्यान, राजपाल यादवने ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला, तिथे त्यांची शिंपी म्हणून निवड झाली. जेव्हा ते तिथे काम करू लागले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून दिले. पण राजपाल यादव यांचा संसार फार काळ टिकला नाही. राजपाल यादव हे 20 वर्षांचे असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

अशी केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

पत्नीच्या निधनानंतर राजपाल यादव लखनऊमध्ये राहू लागले आणि येथूनच त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. यानंतर राजपाल यादव यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजपाल यादव मुंबईत आले. 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

राजपाल यादव यांचे चित्रपट

‘जंगल’ या चित्रपटामुळे राजपाल यादव यांना विशेष लोकप्रियता मिळाली. राजपाल यांनी अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मुझसे शादी करोगी','भूल भुलैया','फिर हेरा फेरी','चुप चुपके' ,'चल चला चल','खट्टा मीठा' या सिनेमातील त्यांच्या कॉमेडी भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply