ENG vs NZ: रूटने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली! विजयाचा नारळ फोडण्यासाठी २८३ धावांचं आव्हान

ENG vs NZ : वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने २८२ धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २८३ धावांची गरज आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. जॉनी बेअरस्टो ३३ तर डेविड मलान अवघ्या १४ धावा करत माघारी परतला.

World Cup 2023 ENG Vs NZ, Update : सलामीच्या सामन्यात NZ ने जिंकला टॉस! गतविजेत्या इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण; ENG चा प्रमुख खेळाडू बाहेर

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जो रुटने संघाची धावसंख्या पुढे नेत ७७ धावा चोपल्या. तर जोस बटलरने ४३ धावांचं योगदान दिलं. 

इंग्लंडचा फलंदाजी क्रम पाहून असं वाटलं होतं की, इंग्लंडचा संघ या डावात मोठी धावसंख्या उभारणार,मात्र इंग्लंडला २८२ धावांवर समाधान मानावं लागलं आहे.न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेनरीने ४८ धावा खर्च करत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर ग्लेन फिलिप्सने १७ धावा खर्च करत २ आणि मिचेल सँटनरने ३७ धावा खर्च करत २ गडी बाद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply