Election Result 2023 : विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

नवी मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला विजय हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने बाजी मारलीली आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील याचा पराभव केला आहे.

आपल्या विजयानंतर बोलताा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं की, हा विजय सर्व शिक्षकांचा आहे. मला सर्व संघटना आणि पक्षाचा चांगला पाठिंबा असल्याने हा विजय शक्य झाला आहे.शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार, असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
 
बाळाराम पाटील यांनी पराभवानंतर म्हटलं, निकाल आलाय तो स्वीकारल आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पेशाचा वापर झाला आहे. पण त्या मुद्द्याकडे ना जाता कोकणच्या शिक्षकांनी जो कौल दिला तो मान्य करतो.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *