Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यास ‘ओबीसीं’चा विरोध आहे. त्यामुळे स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, इतर समाजाच्या आरक्षणाला कुठलाही हानी न पोचवता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होता कामा नये.

Sangli Maratha Morcha News : आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार! सांगलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा; लाखोंचा सहभाग

मनोज जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असली तरी ते शक्य नाही. ज्यांच्याकडे पूर्वी ‘कुणबी’चे रेकॉर्ड होते, पण त्याच्या नोंदी बदलल्या असतील तर सर्वे करून अशा मराठा समाजाला ओबीसीचा लाभ मिळेल, त्यासाठी ओबीसींचा आक्षेपही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाही विचार राज्य शासनाच्या मनात नाही. न्यायालयातून रद्द झालेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी शासनातर्फे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पटोलेंना कोणी गंभीर घेत नाही

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १६) बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसविले आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले, असा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पटोले यांना कोणी गंभीर घेत नाही, असा टोला लगावला.

काही तरी बोलून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेऊन सांगावे की, मी असा माणूस आहे का? माझ्या पोटात एक अन् ओठात एक असा स्वभाव नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाठीमाराच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे, मी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

आरक्षणावरून उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा

मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी ज्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, आज ते आरक्षणाच्या आडून राजकारण करून टीका करत आहेत, असा निशाणा एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता साधला



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply