ED Raid : मुंबई, पुण्यात १९ ठिकाणी ईडीचे छापे, लोकसभा निवडणूक निकालांशी कनेक्शन

ED Raid : लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेकांना आश्चर्यचकित करणारा लागला. अनेकांनी भाजपचा मोठा विजय होईल, असा अंदाज लावला होता. या लोकसभा निकालासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. देशात झालेल्या १८ व्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर सट्टाबाजी झाल्याचा समोर आलंय. “फेअरप्ले” प्रकरणी चालू असलेल्या तपासात अंमलबजावणी संचालनालयने मुंबई आणि पुण्यात धाडी टाकल्या. त्यात ही धक्कादायक बाब समोर आलीय.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा  अंतर्गत मुंबई आणि पुण्यातील १९ ठिकाणी धाडी टाकत ईडीने रोकड, महागडी घड्याळे, बँक आणि डिमॅट खात्यांची माहिती तसेच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत ईडीने एकूण ८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवल्याचा दावाही ईडीने केलाय.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार; बारामतीत घडामोडींना वेग...

आयपीएल सामन्यांचे अनधिकृत प्रक्षेपण आणि बेटिंग प्रकरणी तसेच लोकसभेच्या निकालांवर देखील सट्टेबाजी झाल्याचा दावा ईडीने केलाय. फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीने ही कारवाई केलीय. नोडल सायबर पोलीस, मुंबई यांनी मेसर्सच्या तक्रारीवरून नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीडून तपास केला जातोय. फेअरप्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांनी रु. १०० कोटींपेक्षा जास्त महसूलाचे नुकसान केल्याची तक्रार वायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने नोंदवलीय.

फेअरप्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय एजन्सींसोबत करार केला होता. करार करण्यापूर्वी भारतीय एजन्सींनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करण्यासाठी कोणतीच योग्य खबरदारी घेतली नसल्याचं तपासात समोर आलंय.

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात फेअरप्लेने विविध बोगस/शेल बँक खात्यांद्वारे निधी गोळा केला होता. ज्या शेल संस्थांच्या बँक खात्यांच्या वेबद्वारे साठवण्यात आला होता. नंतर तो पैसा बोगस बिलिंगमध्ये सामील असलेल्या फार्मा कंपन्यांमध्ये जमा झाला होता. ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात फेअरप्लेने विविध बोगस/शेल बँक खात्यांद्वारे निधी गोळा केला होता. ज्या शेल संस्थांच्या बँक खात्यांच्या वेबद्वारे साठवण्यात आला होता. नंतर बोगस बिलिंगमध्ये सामील असलेल्या फार्मा कंपन्यांमध्ये जमा झाला होता. या कंपन्यांचा निधी हाँगकाँग एसएआर, चीन आणि दुबई येथील परदेशी शेल संस्थांना पाठवण्यात आलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply