ED Raid : राज्यभरात ईडीची मोठी कारवाई! मुंबई, ठाणे, जळगावमधून तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त

ED Raid : ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर मिनी बसला भीषण अपघात; देवदर्शनाहून परतताना 12 भाविकांचा मृत्यू, 23 जखमी

या कारवाईमध्ये जळगाव,मुंबई,ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी  आहे.

दरम्यान, ईडीकडून याआधीही जळगावमधील राजमल लाखीचंद ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीचे असलेल्या या ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापा टाकण्यात आला होता. यावेळी तब्बल २४ तासांपासून अधिक काळ दुकानाची चौकशी करण्यात आली होती. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply