Anil Jaisinghani : क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीवर ईडीची मोठी कारवाई; ३.४० कोटींची मालमत्ता जप्त

ED Action on Anil Jaisinghani: केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने (ED) क्रिकेटबुकी अनिल जयसिंघानी याच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने जयसिंघानीच्या नावावर असलेली ३.४० कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यातील बहुतांश मालमत्ता हॉटेल, फ्लॅट, दुकाने, जमीन आणि अन्य स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावणे तसेच १ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी ईडीने अनिल जयसिंघानी याला अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्याच्या मालमत्तेचा तपास सुरू केला होता.

तपासाद्वारे जयसिंघानी याची १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झालं होतं. यामध्ये हॉटेल्स, फ्लॅटस्, दुकाने, भूखंड आणि अन्य काही स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ साली झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त सट्टेबाजी झाल्याचे प्रकरण उजेडात आले होते.

या सट्टेबाजीत गुंतलेले बुकी हे प्रामुख्याने मुंबई व गुजरातमधील होते. या प्रकरणी ईडीच्या अहमदाबाद येथील कार्यालयामध्ये २०१५ सालीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यातील सह आरोपीच्या मदतीने फसवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचे उघड झाले.

जयसिंघानी २०१५ पासून ईडीचे समन्स टाळत असून २०१५ मध्ये विशेष पीएमएलए कोर्टाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. दरम्यान, ९ जून रोजी ईडीने जयसिंघानी यांच्या ओळखीच्या परिसरात छापा टाकला. ईडीने त्याची ३.४० रु. किमतीची स्थावर मालमत्ता शोधून जप्त केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply