Dudhsagar Waterfalls : गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी; सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा मोठा निर्णय

Dudhsagar Waterfalls: सातारा जिल्ह्यातील ओझर्डे धबधबा, महाबळेश्वर नजीकच्या लिंगमळा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातल्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरही पोलीस प्रशासन आणि वन खात्याने बंदी घातली आहे. फेसाळणारा धबधबा पाहणं अनेकांची इच्छा असते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा पर्यटनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील कुळे येथे आहे. या धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वेच्या बाजूने चालत जावे लागते. या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून खाली उतरतात. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Yavatmal Flood : यवतमाळमध्ये महापुरात अडकले ८० जण; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू...

दूधसागर स्टेशनवर उतरल्यास कारवाई होणार

या वर्षी झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. दूधसागर स्टेशनवर कोणीही उतरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणी उल्लंघन केल्यास रेल्वेच्या कलम १४७ नुसार कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. गेल्या आठवड्यात पोलिसांनी पर्यटकांना रेल्वे स्थानक परिसरात रोखलं होतं.

प्रशासनाचा मोठा निर्णय

मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहत आहे. फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धबधब्यावर जाण्याचा प्रवास खूप जीवघेणा आहे. या धबधब्यावर जाताना अनेक अपघातही होतात. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply