Dombivali News : डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी, मेंढ्यांवर लागला लाखोंचा सट्टा; पोलिसात गुन्हा दाखल

 

Dombivali : काही दिवसापूर्वी डोंबिवलीत बैलांच्या झुंज लावत त्यावर लाखोच्या सट्टा लागल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा डोंबिवली पूर्वेतील खंबळपाडा परिसरात रविवारी मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने टिळकनगर पोलिसांनी ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीत काही दिवसापूर्वी बैलांच्या झुंज लावण्याचा खेळ खेळविण्यात आला होता. या बैलांच्या झुंजीवर लाखो रुपयांचा सट्टा लागण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही, तोच पुन्हा एकदा डोंबिवली खंबाळ पाडा परिसरात रविवारी संध्याकाळी मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यात आल्या. विशेष म्हणजे या खेळात उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आले.

Pune GBS : पुण्यात जीबीएस फोफावतोय, ४७ जण ICU मध्ये, रूग्णसंख्या १६३ वर

झुंज लावताना लावला लाखोंचा सट्टा

मेंढ्यांच्या झुंजी लावणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते. या झुंजीत सहभाग घेणाऱ्यांनी लाखो रुपयांचा सट्टा लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कल्याण क्राईम पोलिसांची कारवाई करत टिळकनगर पोलीस स्थानकात ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

दहा जणांना घेतले ताब्यात

दरम्यान मेंढ्यांच्या झुंजी खेळविण्यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह इतर नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने टिळकनगर पोलिसांनी ३० जणांच्या विरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात देऊन त्यांना समजपत्र दिले आहे. तर उर्वरित ३० जण पळून गेले आहे. पसार झालेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply