Dombivali : डोंबिवली पश्चिमेत रिक्षा बंद! वाहतूक पोलीस रिक्षाचालकांचा वाद चिघळला


Dombivali : डोंबिवली पश्चिम भागात वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे. डोंबिवली रिक्षा चालक-मालक युनियनने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलन पुकारले आहे. त्यांनी रिक्षा बंदची हाक दिली. या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतला आहे.

रिक्षा चालकाने पुकारलेल्या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. डोंबिवली पश्चिम परिसरात वारंवार तक्रारी निवेदने देऊनही बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप या रिक्षा चालकांनी केला आहे.

डोंबिवली पश्चिममध्ये वाहतूक पोलीस तैनात नसतात. अनेक जण बेकादेशीररित्या विनापरवाना विना बॅच रिक्षा चालवतात. मात्र वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे. आज सकाळी वाहतूक विभागाचे एसीपी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Satara News : बेपत्ता चिमुकलीचा शेतातच मृतदेह सापडला, अपघात की घातपात? ५ वर्षीय मुलीसोबत नेमकं

काय घडलं?

मात्र, एसीपींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने रिक्षाचालक संतापले. वाहतूक पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली स्टेशन परिसरात रिक्षा बंदची हाक दिली .स्टेशन परिसरात रिक्षा बंदची हाक देण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या डोंबिवली पश्चिममध्ये रिक्षा बंद असून, कधी सुरू होणार? असा प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply