Director General of Police : पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्ष पदावर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते.फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविली. त्यानंतर शासनातर्फे रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोण मारणार? १० ऑक्टोबरपर्यंत BMC घेणार निर्णय

पुढील पोलीस महासंचालक कोण?

रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रश्मी शुक्ला यांना संधी मिळू शकते. रजनीश सेठ 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होतील. या निमित्ताने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply