Dhule : दोन दुकानांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

धुळे : धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात दोन दुकानांना अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचे बघावयास मिळाले आहे. काही मिनिटातच या आगीने रौद्ररुप धारण केले. 

धुळे शहरातील वरदळ असलेल्‍या तिरंगा चौकातील दोन दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे.

दुकानांचे मोठे नुकसान

आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी टळली आहे. मात्र दोन दुकानांमधील मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे सामान जळाल्याने दुकान मालकांचे नुकसान झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *