Dhule : पाण्याच्या बाटल्याआडून दारूची वाहतूक; धुळ्यात पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

Dhule : अनेकदा कारवाई झाल्यानंतर देखील अवैधपणे दारूची वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनावर कारवाई करत एका जणाला ताब्यात घेतले आहे.  

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत अवैधपणे दारूची वाहतूक केली जाणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चाळीसगाव रोड चौफुली परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या वाहनात पाण्याच्या बाटल्यांच्या आड मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी एका जणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Patana Boat Capsizes : गंगा स्नान करायला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १७ जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
सदरच्या कारवाईमध्ये पोलिसांनी वाहनासह दीडशे दारूने भरलेले बॉक्स हस्तगत केले आहेत. त्याची बाजारामध्ये पाच लाख २५ हजार रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासह इतर मुद्देमालासह एकंदरीत ७ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्दामाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply