Dhule News: धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक ठिकाणी पडले झाडे

धुळे : धुळ्यात सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते . यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

झाडाखाली गाडी दबली

धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या खाली उभ्‍या असलेल्‍या कारवर झाड पडल्‍याने गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *