Dhule Bajar samiti Election : कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व

 

धुळे : राज्‍यात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या झालेल्‍या काही जिल्‍ह्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यात धुळे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीवर पुन्‍हा एकदा महाविकास आघाडीचे वर्चस्व राखले आहे. कार्यकत्‍र्यांनी येथे मोठा जल्‍लोष केला.

राज्‍यातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकांमध्‍ये अनेक दिग्‍गजांची प्रतिष्‍ठा पणाला लागली होती. मतदानाच्‍या दिवशी सर्वच पक्षांचे मोठे नेते मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. प्रामुख्‍याने शिंदे–भाजप युती व महाविकास आघाडीच्‍या पॅनल यात वर्चस्‍वाची लढाई होती. त्‍यानुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

१० पेक्षा जास्‍त जागांवर विजय

धुळे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या १६ पैकी जवळपास १० पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यापूर्वी देखील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा वर्चस्व असताना पुन्हा एकदा या निवडणुकीत देखील काँग्रेसचा वर्चस्व कायम ठेवले आहे. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply