Dhangar Reservation : ब्रेकिंग! धनगर आरक्षणाची मागणी फेटाळली; हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

Dhangar Reservation : सर्वात मोठी बातमी. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबद्दलची मागणी धनगर समाजाकडून वारंवार केली जात होती. याबद्दल हायकोर्टाने आज निकाल देत ही मागणी फेटाळून लावली आहे. धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी कॅटेगरीतून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्यावतीने यशवंत सेनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुंबई हाय कोर्टत सुनावणी घेण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाकडून धनगर आरक्षणासंबंधीची  याचिका फेटाळण्यात आली आहे. हा धनगर बांधवांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Mumbai-Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा लढा सुरू आहे. धनगड राज्यात अस्तित्वात नाही राज्यात धनगर अस्तित्वात आहे त्यांना एस टी च्या सवलती मिळाव्या ही धनगर बांधवांची प्रमुख मागणी होती. यासंबंधी रस्त्यावरील लढाईसोबतच 2017 पासून या संबंधीचा न्यायालयीन लढाही सुरू होता. आज संपुर्ण सुनावणी पार पडून न्यायालयाने निकाल देताना आरक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे.

राज्यातील एस.टी.आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू होता. काळेकर समितीनं साल 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे. एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याचे म्हटले होते.

मात्र देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply