Devendra Fadnavis On PM Modi : 'मोदींच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू', देवेंद्र फडणवीस यांचं पुणेकरांना आश्वासन

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर मोदींच्या उपस्थितीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएम मोदींचे तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 'मोदींच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू', असे आश्वासन पुणेकरांना दिले.

या कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'आज आपल्या सर्वांसाठी गौरवाचा दिवस आहे. पुणे मेट्रोचा एक नवीन टप्पा आपण सुरू होत आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्पाची सुरुवात मोदींनी केली होती. दुसऱ्या टप्प्याचीही सुरुवात पंतप्रधान मोदी करत आहेत हे महत्त्वाचे आहे. मागच्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी, एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होतो. पण तिघांचे रोल वेगळे होते. पण आता मात्र महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत.'

तसंच, 'मोदींच्या नेतृत्वात पुणे सर्वोत्तम शहर करुन दाखवू. पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न आहे ते प्रदूषण मुक्त ट्रान्सफर पुण्यात होतेय ते करून दाखवत आहोत. १२ हजार घरांपैकी काहीचं अनावरण आणि भूमिपूजन आज होत आहे. पुण्याला लवकरच एक रिंग रोड आणि विमानतळ देणार आहोत.', अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Jaipur-Mumbai Train Firing Update : जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार प्रकरण, चौकशीसाठी समितीची स्थापना; मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

तर,अजित पवार यांनी सांगितले की, 'पुण्याच्या, महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान मोदी यांनी साथ दिली. देशाच्या विकासाचे ते नेतृत्व करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे. कारण ही सगळी कामे करत असताना अनेक अडचणी येत असतात. पण तुम्ही सहनशीलता दाखवलीत. पुणेकरांनी या कामामध्ये राजकारण न आणता साथ दिली.' यावेळी अजित पवारांनी पुणेकरांच्या सहनशीलतेचे कौतुक केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply