Devendra Fadanvis : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झालाच नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; घटनाक्रमही सांगितला

Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या पावसाची अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. दरम्यान, विरोधकांच्या आरोपांवर सरकारकडून सुद्धा जोरदार उत्तर दिलं जातंय.

आषाढी एकादशीनिमित्त आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत उत्तर दिलं आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग;

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. मागच्या वर्षी मंदिरात प्रवेश दिला, त्यावेळी महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या होत्या. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियोजित बैठक झाली होती. या बैठकीत वरिष्ठ पोलीस आधिकारी, आळंदी शहरातील काही प्रतिष्ठीत मंडळी आणि ५६ दिड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्यामध्ये बैठक झाली.'

'या बैठकीमध्ये ५६ दिंड्याना प्रत्येकी ७५ पास द्यायचं तसंच त्यांना प्रवेश द्यायचं ठरलं होतं. ते मंदिराबाहेर निघाल्यानंतर इतरांना दर्शनासाठी आत सोडायचं होतं. यासाठी सुरक्षा म्हणून तिथे काही बॅरिकेट देखील लावण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी जोग महाराज शिक्षण प्रशालेचे काही आजी-माजी विद्यार्थी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. काहीही न ऐकता ते पोलिसांना तुडवून पुढे गेले"

दरम्यान, पोलिसांनी त्यांना थांबवलं. पुन्हा बॅरिकेट पर्यंत आणलं. याच संपूर्ण घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे शेअर करण्यात आले. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली. आम्ही सीसीटीव्ही तपासले असता, कुठेही लाठीचार्ज झाला नसल्याचं दिसून आलं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply