Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Gadchiroli : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असतो. यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली आहे. दोन्ही तालुक्यात अनेकांचे डेंगूची लागण झाली असून मुलचेरा तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात येल्ला गावातील दोन व्यक्तींचा तर शांतीग्राम गावातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. याठिकाणी डासांची उत्पत्ती होत असून साथरोग पसरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. यात मुलचेरा व चामोर्शी या तालुक्यांमध्ये अधिक रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली असून रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे

एकाच गावात ४१ रुग्ण

Maharashtra : सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

मूलचेरा तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून गेल्या चार दिवसांत २३६ जणांच्या तपासणी करण्यात आली आहे. यात तब्बल ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात १४ वर्षांखालील १२ मुलांचा समावेश आहे. तर तालुक्यातील येल्ला गावात सर्वाधिक ४१ रुग्ण आढळले असून गावातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. स्वतःहून रक्त तपासणी करत आहोत; असे उपसरपंच दिवाकर उराडे यांनी सांगितले.

रोज १०० रुग्णांची तपासणी

दरम्यान १० ऑगस्टपर्यंत २५ रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. येल्ला, लगाम, काकरगट्टा, गिताली, मच्छीगट्टा, टिकेपल्ली, शांतिग्राम येथे रुग्ण आढळले. गेल्या १० दिवसांत १ हजार ६५ रुग्णांची तपासणी झाली. दररोज १०० हून अधिक रुग्ण ओपीडीत येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वाखाली १२ चमू उपाययोजना करत आहेत. पण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *