Delhi Metro Slab : मेट्रो स्टेशनचा स्लॅब रस्त्यावर कोसळला; काहीजण ढिगाऱ्याखाली दबले, बचावकार्य सुरू

Delhi Metro Slab : दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर धक्कादायक घटना घडली आहे. चारदीवाकीत मेट्रो स्टेशनच्या एका भिंतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन ते चार लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. 

स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यात आलंय. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी जेसीबी आणि क्रेनला आणलं गेलं आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झालीय. याबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Lok Sabha Election : मोठी बातमी! ठाकरे गटाचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला

मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला

गुरुवारी दिल्लीतील गोकुळपुरी भागात मेट्रोचा स्लॅब कोसळला. ढिगारा रस्त्यावर पडल्यानं त्याखाली चार दुचाकी गाडल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

हा अपघात सकाळी 11.05 वाजेच्या सुमारास झाल्याची माहिती मिळतेय. गोकुळपुरी मेट्रो स्टेशनखाली नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. त्यानंतर अचानक मेट्रो स्टेशनच्या स्लॅबचा मोठा भाग जमिनीवर पडला. या अपघातात तेथून जाणाऱ्या 4 दुचाकीस्वार ढिगाऱ्याखाली अडकले होते.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply