Degree Admission : बारावीचा निकाल लागला, आता पदवी प्रवेशासाठी धडपड; ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

 

 

Degree Admission : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. बारावीचा निकाल लागला आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे लागले आहे.

निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केल आहे. निकाल लागल्यानंतर लगेचच ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पदवीसाठी चांगले कॉलेज मिळावे यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड आता सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पदवी प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील महाविद्यालयाने पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. बीए, बीकॉम आणि बीएससी या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय आजपासून प्रवेश प्रक्रिया राबविणार आहेत. महाविद्यालयाने निकालानंतर लगेचच आपापल्या वेबसाईटवर प्रवेशांची माहिती प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी वेळापत्रक आणि अर्जाची लिंक ही माहिती महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

12th HSC RESULT : 'आज सगळे सोबत, पण कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत', निकालानंतर संतोष देशमुखांची मुलगी रडली

यंदा उत्तीर्णचे प्रमाण कमी असल्याने पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याला अडचण येणार नाही. निकालात घट झाल्यामुळे पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. यंदाचा निकाल मागील वर्षाच्या तुलने १६ दिवस लवकर लागल्यामुळे महाविद्यालयांनी प्रवेशासाठी अधिक वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र महाविद्यालयांनी लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना लगेचच निर्णय घ्यावा लागणार आहे.

 


९ विभागीय मंडळाचा निकाल -

पुणे - ९१.३२ टक्के

नागपूर - ९०.५२ टक्के

छत्रपती संभाजीनगर - ९२.२४ टक्के

मुंबई - ९२.९३ टक्के

कोल्हापूर - ९३.६४ टक्के

अमरावती - ९१.४३ टक्के

नाशिक - ९१.३१ टक्के

लातूर - ८९.४६ टक्के

कोकण - ९६.७४ टक्के

कोणत्या शाखेतून किती टक्के विद्यार्थी पास?

कोणत्या शाखेची किती टक्केवारी?

विज्ञान- ९७.३५ टक्के

कला- ८०.५२ टक्के

वाणिज्य- ९२.६८ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३ टक्के

आयटीआय- ८२.०३ टक्के

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply