पिंपरी-चिंचवड: मुंबई-पुणे महामार्गालगत वाकड परिसरातील विश्वनाथ हॉटेलपासून पेट्रोल पंप, लाईफपॉईंट हॉस्पिटल मार्गे हिंजवडी पुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडवर गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वायफाय केबलचे तुकडे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडून असल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत हे केबलचे तुकडे पाण्यावर तरंगत राहिल्यास दुचाकीस्वारांच्या चाकात अडकून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसात दृश्यमानता कमी असताना हा धोका अधिक वाढू शकतो.
याशिवाय मुंबई-पुणे महामार्गावरील दुभाजकातील वीज खांबांवर हजारो मीटर लांबीच्या वायफाय केबल्स विविध केबल ऑपरेटरकडून अनधिकृतपणे टाकण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या केबल्स वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे खाली आल्यास वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी हा जीवघेणा धोका ठरू शकतो.
सबवे परिसरातील खड्ड्यांनी वाढवली चिंता
दरम्यान, सखाराम चोखू वाघमारे सबवे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहन चालवतानाही वाहनांचे संतुलन बिघडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जात असल्याने त्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढणार आहे.
प्रशासनाला नागरिकांचे आवाहन
या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देत महापालिका प्रशासन, वाहतूक विभाग, आरटीओ आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून रस्त्यावर पडलेल्या केबल्स हटवाव्यात, अनधिकृत केबल नेटवर्कवर कारवाई करावी तसेच सबवे परिसरातील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
"अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून आधीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणाची किंमत नागरिकांना जीव गमावून चुकवावी लागू शकते," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



