Darshana Pawar Death Case : आधी कटरने गळ्यावर वार केले, नंतर डोक्यात घातला दगड; राहुल हंडोरेची धक्कादायक कबुली

Darshana Pawar Killing  : एमपीएससी उत्तीर्ण तरुणी दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला तिचा मित्र राहुल हंडोरेने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली जबाब दिला आहे. राहुलने आधी दर्शनाच्या गळ्यावर कटरने वार केले आणि नंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचे राहुल हंडोरेने पोलिसांसमोर कबुल केले आहे.

पोलीस चौकशीदरम्यान राहुलने सांगितले की, लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले. त्यामुळे दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर त्याने दगडाने मारहाण करत तिची हत्या केली. मात्र, हे सगळे माझ्या हातून अनवधानानं घडलं असंही त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

राहुलने पोलिसांना सांगितले की, एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केलं होतं. परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. परंतु एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिला संपवायचं ठरवलं.

Monsoon Update : हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; मुंबईसह दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी, पर्वतीय भागात अलर्ट जारी

राहुल हांडोरेने सोमवारी पोलिसांना केलेल्या चौकशीत ही कबुली दिली आहे. या घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे पोलिस तपासातून यापूर्वीच समोर आले होते. त्यानंतर २१ जून रोजी रात्री उशिरा पोलिसांनी राहुल हांडोरेला मुंबईतून ताब्यात घेतलं. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दर्शना पवार नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. राज्यात विशेष प्रावीण्याने तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु तिचा मृतदेह राजगड्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. 

घटनास्थळी दर्शनाचा मोबाईल, बूट, गॉगल, पर्स आणि ओढणी या वस्तू आढळल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान शवविच्छेदन अहवालात दर्शनाच्या डोक्यावर आणि अंगावर मारहाणी जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply