Darshana Pawar Death Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मित्र राहुल हांडोरेला अटक

Pune : MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शना हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी राहुल हांडोरेच्या तपासासाठी ५ पथके रवाना केली होती.

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरेसोबत १२ जूनला राजगडावर फिरायला गेली होती. मात्र जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल एकटाच राजगडावरुन खाली उतरताना दिसला होता. त्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता. त्यामुले दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पथकंही तयार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हांडोरे गायब झाल्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन कात्रज दिसत होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यानंतर दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याने एटीएम कार्डवरुन पैसे काढले होते. त्यानंतर त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. 

अशारितीने तो आपली जागा सतत बदलत होता. मात्र तो मुंबईत आल्याननंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना अटक केली. प्राथमिक माहितीनुसार राहुलला दर्शना सोबत लग्न करण्याची इच्छा होती. यातूनच तिची हत्या झाल्याची माहिती आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply