
मुंबई : मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली. यापैकी 14 गोविंदाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 62 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 31 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री 9 वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, ठाण्यात 17 गोविंदा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले आहे. रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला 10 थर लावता आले नाही. ठाण्यात 'जय जवान' गोविंदा पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.
|
Pune Crime News : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा घरात घुसून विनयभंग, खडकी परिसरातील संतापजनक प्रकार |
कोणत्या रुग्णालयात किती जखमींवर उपचार सुरू?
मुंबई शहर
केईएम रुग्णालय : 31 दुखापत (07 दाखल, 23 उपचाराधीन, 1 डिस्चार्ज)
लोकमान्य टिळक, सायन रुग्णालय : 07 जखमी (डिस्चार्ज)
नायर रुग्णालय: 3 जखमी (डिस्चार्ज)
जे जे रुग्णालय : 3 जखमी (डिस्चार्ज)
हिंदुजा हॉस्पिटल- शून्य
सेंट जॉर्ज रुग्णालय : 03 जखमी (डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय : 2 जखमी (OPD डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल : 16 जखमी (6 उपचाराधीन, 10 डिस्चार्ज)
एस एल रहेजा रुग्णालय : शून्य
बॉम्बे रुग्णालय : एक जखमी (उपचार सुरू)
जसलोक रुग्णालय- शून्य
पूर्व उपनगर
राजावाडी रुग्णालय : 10 जखमी (2 अॅडमिट, 8 डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल : 1 जखमी
वीर सावरकर रुग्णालय : 1 ( रुग्णालयात दाखल)
शतब्दी रुग्णालय : 3 जखमी (1 उपचाराधीन, 2 डिस्चार्ज)
सर्वोदय रुग्णालय : शून्य
पश्चिम उपनगर
वांद्रे भाभा रुग्णालय : 3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
व्ही एन देसाई रुग्णालय : 4 जखमी (डिस्चार्ज)
कूपर हॉस्पिटल : 6 जखमी (२ दाखल, 4 डिस्चार्ज)
भगवती रुग्णालय- शून्य
ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
BDBA रुग्णालय- 9 जखमी (1 दाखल, 8 डिस्चार्ज)
एस के पाटील रुग्णालय- शून्य
नानावटी रुग्णालय- शून्य
ठाण्यात 17 जखमी गोविंदा
ठाणे शहरात दहीहंडी दरम्यान गोविंदा अपघात होऊन 17 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 11 जखमी गोविंदावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर, सहा जखमी गोविंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोणताही गोविंदा गंभीर जखमी झाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


