DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ; थकबाकीही मिळणार

DA Hike : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच १ जुलै पासून राज्य शासकिय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिन कर्मचार्यांच्या वेतनात ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर 43% हून ४६% करण्याचा शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीर येथील राजौरीमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक, 2 कॅप्टनसह चार जण हुतात्मा

थकबाकीही मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने हा महागाई भत्ता १ जुलै २०२३ पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ पासून ते ३१ आक्टोंबर २०२३ या कालावधतील थकबाकीसह नोव्हेंबर २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे, असं शासन निर्णयात म्हटलं आहे. 

याबाबतच्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे?

याबाबत जरी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे की, ''राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.''

यात पुढे लिहिलं आहे की, ''शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ % वरुन ४६% करण्यात यावा. हा महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply