CSK vs KKR : आजपासून क्रिकेटचा महारणसंग्राम; दोन भारतीय दिग्गज आमने-सामने

 

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) चा पहिल्या सामना आज ( दि. 26 मार्च) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. सीएसकेने गेल्या हंगामात आपली चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर केकेआरने आतापर्यंत दोन वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आजचा सामना सायंकाळी 7.30 मिनिटांनी होणार आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात सलामीलाच भिडणाऱ्या सीएसके आणि केकेआर यांचे एकमेकांविरूद्धचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले तर या दोन्ही संघात 26 आयपीएल सामने झाले आहेत. त्यातील तब्बल 17 सामन्यात सीएसकेने विजय मिळवला असून केकेआरला फक्त 8 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. ही आकडेवारी पाहिली तर सीएसकेचा पेपर कायम केकेआरसाठी अवघड गेल्याचे दिसते.

गेल्या हंगामात या दोन संघात तीन सामने खेळले गेले होते. त्यातील एख सामना वानखेडे स्डेडियमवर झाला होता. मात्र या सामन्यात सीएसकेने केकेआरच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत 220 धावा टोकल्या होत्या. केकेआरने देखील त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची गाडी 202 धावांच्या पुढे जाऊ शकली नाही.

या दोन्ही संघातील गेल्या 5 सामन्याची आकडेवारी पाहिली तर केकेआर तिथेही मागे पडले असल्याचे दिसते. केकेआरला गेल्या 5 सामन्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. मात्र यंदाच्या हंगामात केकेआरचा नवा संघ सीएसके समोर नव्याने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. वानखेडेवर केकेआरचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता, केकेआरने वानखेडेवर आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. मात्र त्यातील एकाच सामन्यात त्यांना विजयाची चव चाखता आली होती. तर दुसरीकडे सीएसकेला वानखेडेवर 19 पैकी तब्बल 11 वेळा विजयी आशीर्वाद मिळाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply