CSK vs DC, IPL 2024 : गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

CSK vs DC, IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेत आज सुपर संडेचे सामने पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणार आहे.

तर चेन्नईचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चेन्नईने गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केलं आहे. तर दुसरीकडे दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जकडून पराभूत होऊन आला आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या. अशी असेल चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग ११..

IPL Cricket : सामन्यावरून तुंबळ हाणामारी; कोल्हापुरातील जखमीचा मृत्यू, रोहित शर्मा आऊट होताच केली होती मस्करी

या सामन्यात चेन्नईचा संघ विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. चेन्नईकडून ऋतुराज आणि रचिन रविंद्रची जोडी मैदानावर येऊ शकते. तर अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरील मिशेलसारखे फलंदाज मध्यक्रमात खेळताना दिसून येऊ शकतात. तर रविंद्र जडेजा, एमएस धोनी आणि समीर रिजवी यांच्यावर शेवटी फलंदाजी करण्याची संधी असणार आहे.

रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, शिवम दुबे, रविंद्र जड़ेजा, समीर रिजवी, एमएस धोनी, दीपक चाहर, महेश थिक्षणा आणि तुषार देशपांडे.

तर दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यानंतर रिषभ पंत, स्टब्स आणि ललित यादवसारखे फलंदाज मध्यक्रमात धावा करताना दिसून येऊ शकतात.

तर दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यानंतर रिषभ पंत, स्टब्स आणि ललित यादवसारखे फलंदाज मध्यक्रमात धावा करताना दिसून येऊ शकतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply