Crime News : मुंबई विमानतळावरून ५३ कोटींच हेरॉईन जप्त ; DRI ची मोठी कारवाई

Mumbai : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) CSMI विमानतळावर मोठी करवाई केली आहे. अदिस अब्बा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून ७.६ किलो हेरॉईन जप्त केले. याचे बाजारमूल्य ५३ कोटी रूपये आहे. आरोपींना १० मार्चपर्यंत कोठडीत सुनावण्यात आली आहे. पुढील तपास DRI करत आहे.

काल ७ मार्चला देखील मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५२ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त करत. लालामोहम्मद हबीब शेख (वय ४८) आरोपीस  अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी १३० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

कालच्या कारवाईत शनिवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव, पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक मालाडच्या मालवणी परिसरात गस्त घालत होते. या वेळी या पथकाला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १३० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत ५२ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. 

तपासात त्याने तो ड्रग्जची विक्रीसाठी तिथे आल्याची कबुली दिली. त्याच्याकडील ड्रग्ज जप्त केल्यानंतर सारकारच्या वतीने पोलीस शिपाई सचिन वळतकर यांच्या तक्रारीवरुन लालामोहम्मद शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या वेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply