Crime News : दहा कोटीच्या फसवणुक प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

 

Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला बॅंकेच्या अवसायकासह पाच जणांवर पाेलिसांकडून गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. तारण ठेवलेली मालमत्ता कर्जमक्त करणे, डीडीआरवर संगनमताने फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे दहा कोटी रूपयांची सभासदांची फसवणूक झाल्याचा आराेप हाेत आहे.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक डबघाईत आली आहे. बँकेचा एनपीए वाढल्याने बँकेच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. सोबतच इथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे.

Shocking News : अरे बापरे! पोलीस ठाण्यातील शासकीय पैशांवर पोलिसानेच मारला डल्ला; कुठे घडला हा प्रकार?

या अवसायकानेच दहा कोटीच्या तारण मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेच्या माजी उपाध्यक्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकांसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुप जगताप, अतुल जगताप, साहेबराव जगताप, लक्ष्मण वरकट असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असल्याची माहिती पाेलिस ठाण्यातून मिळाली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply