Crime News : महिलेशी गैरवर्तन; सहाय्यक निरीक्षकासह तिघेजण निलंबित

Crime News : मगरपट्टा सिटी पोलिस चौकीत एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दामिनी पथकातील दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी ही माहिती दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे हडपसर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) त्या महिलेला मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीसाठी बोलावले होते.

Accident News : मालवाहू ट्रकला कारची धडक; तीन जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी

‘या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दोरकर, पोलिस कर्मचारी सोनकांबळे आणि उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल,’ असे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *