Coronavirus : देशासह राज्यात कोरोनाची चिंता वाढली! आज कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांचं निदान, JN1 चे 10 सक्रिय रुग्ण

Coronavirus : देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाचे आढळून येत आहेत. त्यातच नव्या आलेल्या JN1 या व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सोमवार 25 डिसेंबर रोजी राज्यात 28 नव्या रुग्णांचं निदान झालं. तसेच आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत. त्याचप्रमाणे आज 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती देण्यात आलीये. 

सध्या राज्याचा मृत्यूदर हा 1.81 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात एकूण 134 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिलाय. 

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? स्वत: च दिलं उत्तर, म्हणाले...

'या' राज्यात  JN.1 चे सर्वाधिक रुग्ण

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,  गोव्यात JN.1 चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत गोव्यामध्ये  JN.1 चे 34 नवे रुग्ण सापडलेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 10  कर्नाटकात आठ, केरळमध्ये सहा, तामिळनाडूमध्ये चार आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळून आले आहेत.

देशातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 628 नवे रुग्ण आढळून आलेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत देशात 4 कोटी 44 लाख 71 हजार 860 लोकं बरे होऊन घरी परतलेत. सध्या देशात बरे होण्याचा दर हा 38.81 टक्के इतका असून मृत्यू दर हा 1.19 टक्के इतका आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा

गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.

'या' राज्यात आढळले कोरोनाचे रुग्ण

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरपासून ठाणे शहरात 20 रुग्णांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी जेएन.1 प्रकाराचे 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात सध्या कोरोनाचे 27 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply