Maharashtra Politics: महाविकास आघाडी एकत्र लढणार? काँग्रेसची भूमिका स्पष्ट; आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि पक्षातील बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन युती सरकारमध्ये सामिल झाले. राष्ट्रवादीतील या भूकंपामुळे राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की 'आम्ही (राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट) भाजपविरोधात एकत्र लढू. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राज्यातील जनता आमच्यासोबत आहे'.

NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

विरोधी पक्षनेतेपदावर बोलताना थोरात म्हणाले की, "ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदार असतील, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असेल. आमच्याकडी आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा विरोधी पक्षनेता होईल"

दरम्यान उद्धव ठाकरे देखील आज महाविकास आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पक्षाची भूमिका ठरवण्यात येणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील महाविकास आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी एकत्र राहील असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील पवारांशी चर्चा झाली असून, त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत मिळून पुन्हा सर्व उभा करू असा शब्द दिल्याचे सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply