Coin of Rs 75 release : PM मोदींकडून ७५ रुपयांच्या नाणं जारी; NCCच्या कार्यक्रमात घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ रुपयांचं स्मारक नाणं जारी करण्यात आलं आहे. नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात NCC ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे विशेष नाणं प्रकाशित करण्यात आलं. एनसीसीच्या पीएम रॅलीनंतर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला १९ देशांतील १९६ अधिकारी आणि कॅडेट्स सहभागी झाले होते. 

यावेळी मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या या काळात एनसीसीदेखील आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या ७५ वर्षांच्या काळात एनसीसीचं ज्या लोकांनी प्रतिनिधीत्व केलं, जे याचा भाग राहिले आहेत. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात त्याचं मोठं योगदान आहे.

आपण एनसीसी कॅडेट्सच्या रुपात आणि देशातील तरुणांच्या रुपात एक अमृत पिढीचं नेतृत्व करत आहात. ही अमृत पिढी येणाऱ्या काळात २५ वर्षात देशाला एका नव्या उंचीवर पोहोचवेल, भारताला आत्मनिर्भर आणि विकसित बनवेल. आता भारताचा काळ आला आहे, प्रत्येकजण भारताची चर्चा करत आहे. याचं श्रेय भारताच्या तरुणांना देता येईल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *