Coastal Road : वर्सोवा–दहिसर सागरी किनारा मार्गाला गती; खाडीखालून बोगदे, दुहेरी उन्नत रस्ते—लिंक रोडला जोडणारा मार्ग कसा असेल?

Mumbai : वर्सोवा ते दहिसर या सागरी किनारा मार्गाला आता आणखी गती मिळणार आहे. या प्रकल्पातील सीआरझेड क्षेत्रातील कामासाठी वन विभागाचीही मंजुरी आवश्यक होती. त्याशिवाय कामे पुढे सरकू शकत नव्हती. अखेर या कामाला वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रातील कामे सुरू होऊन प्रकल्पाचे काम पुढे सरकण्यास मदत मिळणार आहे.

कसा असेल मार्ग?
मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आता मुंबई महापालिकेने वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम केले जात आहे. हा मार्ग काही पट्ट्यांत दुहेरी उन्नत मार्ग, तर, काही पट्ट्यांत खाडीखालून बोगद्याद्वारेही होणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. सहा टप्प्यांत होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६२१ कोटी रुपये आहे. साधारण २२ किमी. लांबीचा वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्ग आहे. यामुळे प्रवास वेगवान आणि झटपट होण्यास मदत मिळणार आहे.

Pune Metro : मेट्रो विस्तारासाठी ५१७ कोटींचा निधी मंजूर; हिंजवडी–शिवाजीनगर, पिंपरी, स्वारगेट—मार्ग कुठे, कसे असतील

महापालिकेच्या भूखंडावरील या सागरी किनारा मार्गाचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र सीआरझेड क्षेत्रातील कामे परवानगीविना थांबली होती. मोठ्या प्रमाणात कांदळवने, विविध झाडांमुळे सीआरझेडसह विविध परवानग्या मिळणे आवश्यक होते. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर वन विभागाची परवानगी महापालिकेला मिळाली नव्हती. अखेर ही परवानगी मिळाल्याची माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. त्यामुळे सीआरझेडमधील कामे लवकरच सुरू होतील. सीआरझेडवगळता अन्य ठिकाणांची कामे सुरू असल्याचे बांगर म्हणाले.

2 तासांचं अंतर 20 मिनिटांवर
वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाला दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाची जोड दिली जाणार आहे. तर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाला की वर्सोवा ते दहिसर, भाईंदरपर्यंत प्रवासाला लागणारा वेळ 2 तासांवरून थेट 20 मिनिटांवर पोहचणार आहे. 33.6 किमीचं अंतर सुद्धा 23.2 किमीवर येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2028ची डेडलाईन दिली असून हा मार्ग पश्चिम मुंबईतील कोस्टल रोड, वांद्रे वरळी सी लिंक आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकलासुद्धा जोडण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Coastal Road : वर्सोवा–दहिसर सागरी किनारा मार्गाला गती; खाडीखालून बोगदे, दुहेरी उन्नत रस्ते—लिंक रोडला जोडणारा मार्ग कसा असेल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *