Coal Scam: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण! विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर ; सीबीआयला आठ आठवड्यांची मुदत

Coal Scam Case : कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दणका दिला होता. या प्रकरणी न्यायालयाने विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता दर्डा पिता-पुत्राला दिल्ली विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. 

दर्डा पिता-पुत्राला न्यायालयाने तत्पूर्ता जामीन मंजूर केला आहे. तसेच सीबीआयला ८ आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी किमान दोन महिन्यांचा दिलासा दर्डा पित्रा-पुत्राला मिळाला आहे. दर्डा कुटुंबाला सीबीआयच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. 

Crime News : रील बनवायचं वेड, मातापित्याने ८ महिन्याच्या पोटच्या लेकराला विकलं; कारण ऐकून पोलिसही चक्रवले

कोळसा घोटाळाप्रकरणी दर्डा पिता-पित्राला कोळसा खाण प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply