CM Shinde : विसापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

CM Shinde : चंद्रपूरला आजही ‘चांदा’या नावाने ओळखले जाते. आज येथे १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे. येथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बोटॅनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल.

Loksabha Election : मुंबईत भाजपकडून तिकीट वाटपात धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता, बड्या नेत्यांचं तिकीट कापलं जाणार?

शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे, येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहे, याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply