Cm Eknath Shinde : एसटी कामगारांसाठी खुशखबर! आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Cm Eknath Shinde : एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज एसटी महामंगळाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''आजचा वर्धापण दिन सोबतच अमृत महोत्सव दिन आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जून ते सोन अस म्हंटले जाते.'' 

ते म्हणाले, एसटीची सेवा सुधारत चालली आहे. ते म्हणाले, नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटी बद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. मोफत

एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली

एसटीची पहिली फेरी १ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली होती. या घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा केला जात आहे. १ जून रोजीच एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली होती. त्यामुळे या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षाला एसटी महामंडळाच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे.

प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे सगळ्यांना (विरोधी पक्षाला) जरा भीती वाटत आहे. एसटीने आता दाखवले आहे की हम भी किसीसे कम नही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply