Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Cm Eknath Shinde on Maratha Reservation Protest: जालन्यातील शहागड येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांनी आंदोलकांनावर लाठीमार केला आहे. तर याठिकाणी जाळपोळीची घटनाही घडली आहे. मात्र ही जाळपोळ कोणी केली, हे अद्याप स्पष्ट नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझी पर्वा फोनवर चर्चा झाली होती. जिल्हाधिकारी यांनीही घटनास्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. 

Jalna News: मराठा आरक्षण आंदोलन पेटलं; जालन्यात आंदोलकांनी बस पेटवली

ते म्हणाले की, मनोज यांना मी सांगितलं की उपोषण करू नका. तुमच्या मागणीवर आपले अधिकारी काम करत आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी जे उपाय करायचे आहेत, ते सरकार करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारचीही आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ''झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या मागे पूर्ण सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. जो दुर्दैवी प्रकार घटना आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.''

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply