Government Job : राज्यातील ७५ हजार तरुणांना रोजगार देणार; शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Government Job : मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही, आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले. आमचं सरकार हे जनतेच्या हिताचं सरकार आहे. अडीज वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत शासन आपल्या दारी हा उप्रकम राबवण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. यावेळी लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमधील कामाचा आढावा सांगितला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे बसचा प्रवास वाढला. ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करु लागले आहेत. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

त्याचबरोबर, आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. चकरा, खेटे घेणे हे शब्द काढूव टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले.

'७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय'

आमच्या सरकारने ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल, केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. फंड देत आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply