Cm Eknath Shinde : हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, रस्त्यावर झाडू मारत सफाई; मुंबई स्वच्छता मोहिमेत CM शिंदेंचा सहभाग

Cm Eknath Shinde : स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने प्रत्‍येक विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम म्हणजेच डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबविण्‍याचे नियोजन केले आहे. आज त्याचा दुसरा टप्पा जुहू इथून सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

राजधानी  मुंबईमध्ये  प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सरकारकडून यासंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने प्रत्‍येक विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम सुरु केली आहे. आज (शनिवार, ९ डिसेंबर) या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

OBC Sabha : ज्या मैदानावर जरांगेंची सभा झाली, त्याच मैदानावर आज भुजबळांची तोफ धडाडणार

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाण्याचा पाईप हाती घेत स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी ट्रॅक्टर चालवण्याचाही आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"प्रदूषण दूर करण्यासाठी क्लीन मोहिम मुंबईकांसाठी हाती घेतली आहे. ही चळवळ शहरभर चालू करणार आहे. मुंबई स्वच्छ आणि चांगली करण्यासाठी खरा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. सफाई कर्मचारी 1 तास पूर्वी कामावर येतातप मोठी समाज सेवा करतात," असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या मुख्यमंत्री फक्त दिखावा करतात या टिकेला सडेतोड उत्तर दिले. "२० वर्षे त्यांनी देखावा तरी करुन दाखवायला हवा होता. त्यांना तेही जमलं नाही, तेही केलं नाही. ते काहीही म्हणो आम्ही लक्ष देत नाही. आम्ही काम करतोय," असे ते म्हणाले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply