CM Eknath Shinde : सलमान खान गोळीबार प्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तीला सोडलं जाणार नाही

CM Eknath Shinde : पहाटे ५ च्या सुमारास बॉलिवूड अभिनेत्याच्या घरासमोर गोळीबार झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

आज पहाटे सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबईत तणावाचे वातावरण वाढले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खानशी फोनवरून चर्चा करून त्याला सुरक्षेसंदर्भात दिलासा दिलाय.

PM Modi : युवा, महिला, गरीब, तृतीयपंथी; संकल्पपत्रात पंतप्रधान मोदींनी कोणत्या योजनांच्या घोषणा केल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली आहे. साम टीव्हीशी फोनवरून बातचीत करताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, घटनेप्रकरणी आरोपींना तात्काळ पकडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्यात. ऐन निवडणुकीच्या काळात कुणी कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही, असा इशारा शिंदेंनी दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना देखील आवाहन केले आहे. हवेत गोळीबार करून पळालेल्या आरोपींना लवकरच पकडले जाईल. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही. मुंबई सुरक्षित ठेवण्याचं काम गृहविभाग आणि पोलीस प्रशासन करत आहे. तशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिसांना दिल्या असून पोलीस आणखी अॅक्टीव्ह मोडमध्ये काम करत आहेत, असं ते म्हणाले.

घडलेल्या घटनेनंतर विरोधकांकडून आपकी बार गोळीबार सरकार अशा घोषणा करत सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यावरही देखील एकनाथ शिंदेंनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्यांच्या काळात उद्योगपतींच्या घराखाली बाँम्ब ठेवण्यात आले. गृहमंत्री देखील जेलमध्ये गेले, अशा विरोधकांवर आम्ही काय बोलणार. त्यामुळे यावर आम्हाला फार बोलायचे नाही टीका करायची नाही, झालेली घटना दुर्दैवी आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही."

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply